नालासोपा-यातील फेरीवाल्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे प्रशासकीय अधिका-याच्या (Civic Officer) जीवावर बेतले आहे. रस्त्यांवर अवैधरित्या भाजी विकणा-या फेरीवाल्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिका-यावर तेथील फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, नालासोपा-यात माव परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यात 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
यात प्रशासकीय अधिकारी गोकुळ पाटील यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. ठाणे: रेल्वे स्थानकात चहाचे ग्लास धुण्यासाठी वापरला जातोय कचऱ्याचा डब्बा; सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे खळबळ
वसई-विरार महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी गोकुळ पाटील आपल्या टीमसह नालासोपा-यातील राज नगर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता, तेथे अवैधरित्या भाजीपाला विक्रीस बसलेल्या महिलेस गोकुळ पाटील यांनी रोखले. यावेळी त्या महिलेने पाटील यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची कॉलर पकडली. ते पाहून अन्य दोन पुरुष फेरीवालेही तिला सामील होऊन त्यांनी पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत गोकुळ पाटील यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सदर घटनेत नालासोपारा पोलिसांनी या तीनही फेरीवाल्यांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबई येथील जुहू (Juhu) परिसरात पोलिसांनी (Mumbai Police) फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली होती. वाहतुकीला अडथळा होत असल्याने फेरीवाल्यांना हटवण्याचे काम पोलीस करत होते. यावेळी पोलीस आणि फेरीवाले यांमध्ये मारहाण झाल्याची बातमी होती. मात्र फेरीवाल्यांनी आधी पोलिसांवर हात उगारल्याने पोलिसांना आपला खाक्या दाखवावा लागल्याचे समोर आले होते.