COVID19: नागपूर येथील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णाला इंदिरा गांधी रुग्णालयातून डिस्चार्ज; 2 अहवाल निगेटिव्ह
Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वत्र हाहाकार माजवला असून नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच नागपूर (Nagpur) येथील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. नागपूर येथे आढलेल्या कोरोना बाधीत पहिल्या रुग्णाला शहरातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात (Indira Gandhi Medical College & Hospital) दाखल करण्यात आले होते. नुकताच या रुग्णाचे 2 वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आले असून त्याला डिसार्च (Nagpur's First COVID19 Patient Discharged) देण्यात आला आहे. सध्या भारतातील कोरोना बाधीत रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात एकूण 125 कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यापैंकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्याही औषधाची निर्मिती झाली नसल्यामुळे लोक अधिकच घाबरून गेले आहेत. परंतु, कोरोना हा बरा होणारा आजार आहे, असे संकेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारंवार देत आहेत.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. मात्र, कोरोनाबाधीत लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान, कोणताही नागरिक घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले कोरोना व्हायरस विरोधात केंद्र सरकारचे विशेष पॅकेज; कर्मचारी, महिला, शेतकरी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मदत

एएनआयचे ट्वीट- 

भारतात आतापर्यंत 649 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 42 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 125 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.