Nagpur ZP Election Results 2020: नागपूर जिल्हा परिषदेमध्ये नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे या भाजपा दिग्गजांना धक्का; काँग्रेस उमेदवार विजयी
Nitin Gadkari | (Photo Credit-PTI)

Nagpur Zilla Parishad Election Results:  सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशा चुरशीच्या लढाईत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. भाजपाने धुळे जिल्हा परिषदेमध्ये मुसंडी मारली आहे. मात्र नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांना धक्का बसला आहे. नितीन गडकरींचे मूळ गाव धापेवाडा (Dhapewada) येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.  इथे पहा जिल्हा परिषद निकालाचे लाईव्ह अपडेट्स

आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीनंतर अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदेमध्ये आज मतमोजणी होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 58 जागांसाठी मतदान झाले आहे. त्यापैकी हाती आलेल्या निकालानुसार, भाजपाकडे 6, कॉंग्रेसकडे 12,  एनसीपीकडे 6 जागा आल्या आहेत.

पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी टफ फाईट आहे. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, धुळ्यात अनिल गोटे विरुद्ध भाजप तर, अकोल्यात चौरंगी लढत होतेय. भाजप, शिवसेना, वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सामना होतोय. वाशिममध्ये बहुरंगी लढत रंगणार आहेत.