प्रेमभंग: तरुणीवर हृदयचोरीचा आरोप, तरुणाची नागपूर पोलिसांत धाव, परिसरात चर्चा
ब्रेकअपनंतरही फक्त तूच | (Photo courtesy: archived, edited, representative image)

'कानून के हात लंबे होते हैं' असं म्हणत भल्याभल्या गुन्हेगरांना वटणीवर आणणारे पोलीसही हात टेकतात मामला जेव्हा नाजूक असतो. काहीसे असेच घडले नागपूर पोलिसांसोबत (Nagpur Police). जेव्हा एक तरुण त्यांच्याकडे तक्रार घेऊन आला. तक्रारदाराची तक्रार ऐकून घेत गुन्हा नोंदवणं हे तसं पोलिसांचं कामच. पण, हे प्रकरण जरा निराळं होतं. तक्रार करणारा तरुण कोणा गुन्हेगाराविरुद्ध तक्रार करत नव्हता. त्याची तक्रार वेगळीच होती. हा पठ्ठा एका तरुणीविरुद्ध तक्रार करत होता. आणि तक्रार काय? तर म्हणे 'एका मुलीने माझे हृदय चोरलं' (Stolen Heart). इथं हृदय म्हणजे थेट हार्ट नव्हे बरं. मन, दिल अशा अर्थानं हृदय. सुरुवातीला पोलिसांना मामला गंभीर वाटला. त्यामुळे त्यांनीही सर्व प्रकरण ऐकूण घेतलं. पण, हे प्रकरण पूर्ण ऐकूण घेतल्यावर या प्रकरणात आपण नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत पोलिसांतच संभ्रम निर्माण झाला. प्रकरण होतेच तसे.

काय आहे प्रकरण?

प्रकरण आहे नागपूर येथील एका पोलीस स्टेशनमधील. एक तरुण आला आणि त्याने एका तरुणीने माझे हृदय चोरले आहे. ते तुम्ही शोधून द्या. तशी माझी रितसर तक्रार घ्या आणि मला मदतही करा, अशी गळ घातली. तरुणाचे रुप आणि त्याचे एकूण वर्तन पाहता पोलिसांना लगेच अंदाज आला की, हे प्रकरण प्रेमभंगाचे (Breakup) आहे म्हणून. हा तरुण एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, तिने भाव न दिल्याने स्वारी थेट पोलीस स्टेशनातच पोहोचली. पोलीसांनी कशीबशी तरुणाची समजूत काढली आणि या प्रकरणात आपण काही करु शकत नाही, असे सांगीतले. पोलिसांत तक्रार दाखल न झालेल्या या प्रकरणाची आणि प्रेमभंग झालेल्या या तरुणाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. (हेही वाचा, प्रेमाच्या नादात महिला झाली पुरुष, प्रेयसीने दिला दगा)

दरम्यान, हे प्रकरण घेऊन पोलिसांमध्ये गेलेल्या तरुणाची मानसिक स्थिती समजून घेण्याची गरज आहे. काही लोक हे इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी असे वर्तन करतात. तर, काही लोक घरात इतके लाडावलेले असतात की त्यांना नकार ऐकण्याची सवयच नसते. त्यामुळे अशा लोकांचे योग्य पद्धतीने मानसिक समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ नोंदवतात.