Nagpur Traffic Police | (Photo Credit - Twitter)

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस नेहमीच सक्रीय असतात. शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग ( No Parking) झोन तयार करतात. नागरिकांना वाहतूक शिस्त लागावी हा त्यामागचा हेतू असतो. तसेच, रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांवरही वाहतूक विभाग कारवाई करतो. ही कारवाई करणयासाठी काही कंत्राटदार कंपन्यांनाही हे काम दिले जाते. ते नियमबाह्य पद्धतीने उभ्या केलेली वाहने उचलात. पण ही कारवाई करताना कधी कधी अधिक अमानूषपणे वर्तन केले जाते. अशाच प्रकारचे वर्तन नागपूर पोलीसांच्या वाहतूक विभागाकडून (Nagpur Traffic Police) झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात वाहतूक पोलीस या घटनेत थेट सहभागी नसले तरी ज्या कंत्राटी कंपनीने हे कृत्य केले आहे. दुचाकीस्वाराला बाईकसह टोचण लाऊन उचलले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात दुचाकीस्वार क्रेनच्या (Hydraulic Crane) दोरीला हवेत लटकताना दिसतो आहे.

घटना नागपूर शहरातील अंजुमन कॉम्प्लेक्स परिसरातील आहे. प्राप्त माहितीनुसार, एका व्यक्तीने आपली दुचाकी नो पार्किंग असलेल्या ठिकाणी लावली होती. त्यामुळे कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळी कारवाईसाठी आले. वाहने उचलण्यासाठी ते हायड्रॉलिक क्रेन सोबतच घेऊन आले होते. कारवाईला सुरुवात होताच दुचाकीचा मालक घटनास्थळी आला. त्याने आपण गाडी बाजूला घेत आहोत. कारवाई करु नका म्हणत गाडी बाजूला घेण्यास सुरुवात केली. तो आपल्या दुचाकीवरही बसला. पण, मुजोर कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीसह दुचाकी क्रेनने उचलली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. (हेही वाचा, Jalna News : बायको गेली माहेरी, दारुडा नवरा विरहात व्याकूळ; मोबाईल टॉवरवर 'शोले स्टाईल' आंदोलन (Video))

ट्विट

वाहतूक पोलिसांकडे असलेल्या कंत्राटी कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्यांविरुद्ध परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधिक विभागाकडून कंपनीवर कारवाई करण्या आल्याचे समजते.