IndiGo Flight 6E 636 मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड; उड्डाणापूर्वी दोष समजल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सह 100 प्रवासी सुरक्षित
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नागपूर -दिल्ली (Nagpur to Delhi) या इंडिगो (IndiGo) 6E 636 या विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. या विमानामधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र उड्डाणासाठी जेव्हा हे विमान रनवे आलं तेव्हा त्यामध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. यानंतर उड्डाण रद्द करून सार्‍या प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलं.

आज सकाळी नागपूर - दिल्ली हे इंडिगोचं विमान हवेत झेपावणार होतं. नितीन गडकरी सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघाले होते. विमानात बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. IndiGo चं पुणे-नागपूर विमान टेक ऑफ नंतर 'Engine Caution Message'मुळे माघारी, पुण्यात सुरक्षित लॅन्डिंग

ANI Tweet 

4 ऑगस्ट दिवशी देखील लखनऊला जाणार्‍या इंडिगो विमानात 143 प्रवासी होते. हे विमानदेखील अशाचप्रकारे रद्द करण्यात आलं होतं. तांत्रिक दोष समजल्यानंतर सुमारे तासाभरानंतर त्याचं उड्डाण झालं.