IndiGo चं पुणे-नागपूर विमान टेक ऑफ नंतर 'Engine Caution Message'मुळे माघारी, पुण्यात सुरक्षित लॅन्डिंग
इंडिगो | प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: ANI)

IndiGo Pune-Nagpur Flight: इंडिगोच्या (IndiGo) एका विमानाचं आज पुणे विमानतळावर (Pune Airport) इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. पुणे - नागपूर ( Pune-Nagpur Flight) विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच पुन्हा पुण्याकडे फिरवण्यात आले. विमानाच्या पायलटला 'आपत्कालीन मेसेज' मिळाल्यानंतर विमान तात्काळ मागे फिरवण्यात आले आहे. पुणे विमानतळावर या विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले आहे.

ANI ट्विट 

पुण्यात विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर आता टेक्निकल टीमकडून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी देखील अशाच प्रकारे दिल्लीहून इस्तांबूलकडे जाणारे विमान कुवेत येथे इमरजंसी लॅन्डिंग करून उतरवण्यात आलं होते.