नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा हा बसत आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून काळे ढग दाटून आले, सायंकाळपर्यंत जोरदार वारे वाहू लागले आणि जोरदार पाऊस झाला. याच काळात नागपूर शहराच्या आसपास गारपीट झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. या पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
पाहा पोस्ट -
#नागपूरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही भागात गारपीट झाली. तापमानाचा पारा ४३ अंशावर गेल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. #Nagpur #Unseasonalrain
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)