Social Distancing at vegetable markets in Nagpur (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे वाढते प्रस्थ पाहता विविध उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टसिंग (Social Distancing) पाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागपूर (Nagpur) येथील भाजी मंडईत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाज्यांची वाहतूक करणाऱ्या दोन कन्टेनरमध्ये ठराविक अंतर रहावे, गर्दीला आळा बसावा यासाठी काही व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त राजू भिवगडे (Raju Bhivgade, Assistant Commissioner) यांनी सांगितले की, "भाज्याच्या दोन कन्टेनरमध्ये 10-15 फूटाचे अंतर राहिल अशी खबरदारी आम्ही घेत आहोत. त्यासाठी आम्ही जमिनीवर मार्किंग केलं असून त्यानूसार कुपन्स देण्यात आले आहेत."

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवांचा पुरवठा सुरु आहे. मात्र त्याची खरेदी करण्यासाठी लोकांची एकज झुंबड उडते आणि सोशल डिस्टसिंगचा नियम धाब्यावर बसवला जातो. हे टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. यापूर्वी राज्यातील अनेक  शहरांमधील बाजारापेठांमध्ये गर्दी टाळण्यासाठी खास उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. (पुणे येथे हातावर क्वारन्टाईनचा शिक्का असणाऱ्या महिलेचा नागरिकांकडून मानसिक छळ)

ANI Tweet:

महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 423 झाली असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणे सील करण्यात आली आहेत. तसंच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी रस्त्यावर जागोजागी पोलिसही तैनात आहेत.