Tukaram Mundhe Transfer: नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव पदावर बदली
Tukaram Mundhe | (Photo Credit: Facebook)

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Nagpur Municipal Corporation Commissioner Tukaram Mundhe) यांची अखेर बदली झाली आहे. तुकारम मुंढे (Tukaram Mundhe Transfer) यांची मुंबई येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran) सदस्य सचिव म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. गेल्या काही काळापासून नागपूर महापालिका महापौर, सर्वपक्षीय सदस्य आणि तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्यात तीव्र संघर्ष असल्याचे निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. अर्थात तुकारा मुंढे आणि वाद हे समिकरणच गेल्या काही काळात निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तुकाराम मुंडे यांच्याविरुद्धचा तक्रारींचा पाढा अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढेही वाचला होता. दरम्यान, मुंढे यांच्या बदलीच्या बातम्या अनेक वेळा प्रसारमाध्यमांतून आल्या आणि विरल्या. मात्र, मुंढे हे नागपूर पालिका आयुक्त म्हणून कायम राहिले. मात्र, अखेर मुंढे यांच्या बदलीचे वृत्त आले आहे.

तुकाराम मुंढे यांची कोरोना व्हायरस चाचणी नुकतीच पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांच्या बदलीचेही वृत्त आले आहे. तुकाराम मुंढे हे वादग्रस्त परंतू अत्यंत धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

तुकाराम मुंढे यांची 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषद सीईओ म्हणून नियुक्ती झाली. पहिल्याच दिवशी त्यांनी विविध शाळांना भेटी देत आढावा घेतला आणि गैरहजर असलेल्या शिक्षकांचे निलंबन केले. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्यावर त्यांनी काही डॉक्टरांनाही निलंबीत केले होते.

पुढे मुंढे यांची नियुक्ती सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. तेथेही त्यांनी वाळूमाफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. ते पंढरपूर मंदिर समितीचे चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंख्यमंत्री पदावरील व्यक्ती वगळून इतर व्हिआयपी दर्शनाची पद्धत बंद केली.

नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावर बदली झाल्यानंतर तिथेही त्यांनी अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. त्यामुळे तेथे त्यांचा आणि राजकीय मंडळीसह इतरांशी संघर्ष झाला. नवी मुंबई पालिकेत त्यांच्यावर अविश्वास ठरावही आणण्यात आला. (हेही वाचा, Tukaram Mundhe Corona Positive: नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोना विषाणूची लागण)

नवी मुंबई नंतर त्यांची पुणे येथील पीएमपीएमएल अध्यक्ष पदावर बदली झाली. तिथेही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली. पीएमपीएलचा तोटा कमी करुन महसूल वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. परंतू, कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे पुन्हा ते चर्चेत आले. तेथून त्यांची बदली नाशिक येथे करण्यात आली.

नाशिक येथे बदली झाल्यावर ते काही काळ तिथे काम करतील अशी आशा असतानाच त्यांची नागपूर मनपा आयुक्त म्हणून बदली झाली. इथेही त्यांच्यात आणि नगरसेवकांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला. अखेर आता पुन्हा एकदा त्यांची मंबई येथील जीवन प्राधीकरण येथे बदली झाली आहे.