नागपूरचे महापौर संदीप जोशी (Nagpur Mayor Sandip Joshi) हे कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आढळले असून त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. गेले 8 महिने आपण कोरोना व्हायरससारख्या विषाणूपासून आपल्या जनतेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना आता आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर लोकांनी देखील सुरक्षित राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्यावर उपचार सुरु झाले आहेत अशी माहिती देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
कोरोना व्हायरसने आतापर्यंत अनेक दिग्गजांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. यात अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. लोकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर पडून काम करणा-या या नेत्यांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी अनेक लोक त्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे हा फैलाव झपाट्याने होतो असेही दिसून येत आहे. नागपूरचे महापौर यांना देखील कोरोनाची लागण झाली असून आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.हेदेखील वाचा- Ranjitsinh Disale Tested Positive for Covid-19: ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोविड टेस्ट करण्याचे आवाहन
माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार सुरु झाले आहेत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
— Sandip Joshi (@SandipJoshiNGP) December 10, 2020
गेल्या 24 तासात भारतात 31,522 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 97,67,372 इतकी झाली आहे.गेल्या 24 तासांतील 412 जणांसह एकूण मृतांची संख्या 1,41,772 इतकी झाली आहे. भारात सध्यास्थितीतील कोरोना रुग्णांची संख्या 3,72,293 इतकी आहे.