सोशल मीडियाच्या अभासी जगात निर्माण होणाऱ्या नातेसंबंधावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. समाजातून अनेकदा अशा घटना पुढे येतात ज्यामुळे हे प्रश्नचिन्ह अधिक ठळक होते. नागपूर (Nagpur) येथेही अशीच एक घटना घडली आहे. एका फेसबुक मित्राने (Facebook Friend) तरुणीवर बालात्कार (Rape) केल्याची घटना पुढे येत आहे. या तरुणीची आणि पीडित तरुणीची फेसबुकद्वारे (Facebook) ओळख झाली. या ओळकीचे रुपांत मैत्रीत आणि पुढे या अनर्थात झाले. तरुणावर आरोप आहे की त्याने पीडितेचे नग्न छायाचित्रे काढली तसेच तिचे अश्लील चित्रफीतही बनवली. ही छायाचित्रे आणि चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणाने पीडितेस शरीरसंबंध ठेवण्यास वारंवार प्रवृत्त केले.
प्राप्त माहितीनुसार, जगदीश केशव आर्वीकर (वय २३, रा. बांगलादेश, नाईक तलाव, पाचपावली) असे या तरुणाचे नाव आहे. प्राप्त तक्रारीवरुन कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक माहिती अशी की पीडिता ही 19 वर्षांची युवती आहे. ती नागपूर येथील टिमकी परिसरात राहते. पीडितेची वडील व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. पीडिता कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकते. आरोपी आर्वीकर याने शिक्षण अर्थवट सोडले असून सध्या तो बेकार आहे.
आरोपी जगदीश आर्वीकर याने पीडतेला 2 एप्रिल 2018 मध्ये फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनेही तिकडून कोणतीही शाहनिशा न करता ती स्वीकारली. आरोपी आणि पीडिता यांच्यात मेसेंजरवर सवाद सुरु झाला. हा संवाद पुढे अधिक वाढत गेला. त्यातून दोघांचे एकमेकांना व्हॉट्सअॅप क्रमांकाचे आदानप्रदान झाले. व्हॉट्सअॅप चॅटींगवरच न थांबता पुढे दोघांनी व्हिडिओ कॉलिंगवर बोलणे सुरु केले. संवादातून वाढलेल्या जवळकीतून आरोपीने पीडितेला भेटण्यासाठी तगादा लावला. (हेही वाचा, BJP MLA Surendra Singh: मुलींवर चांगले संस्कार करा, बलात्कार थांबतील- भाजप आमदार)
आरोपीने केलेल्या आग्रहावरुन एक दिवस पीडितेने त्याला आपल्या घरी बोलावले. या वेळी पीडितेच्या घरी कोणीही नव्हते. दोघांमध्ये लग्नाच्या अणाभाका आगोदरच झाल्या होत्या. दरम्यान, आरोपीने पीडितेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पीडितेने त्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली. याच वेळी त्याने तिची नग्न छायाचित्रे काढली. तसे अश्लिल व्हिडिओही बनवले.
दरम्यान, आरोपी पीडितेला याच चित्रफिती आणि छायाचित्रांचा वापर करत पीडितेला लॉजवर घेऊन जात असे. शरीरसंबंध नाही ठेवले तर तिच्या अश्लिल चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल ( फेसबुक, इंस्टाग्राम आणि वॉट्सॲपवर ) करण्याची धमकी देत होता. इतकेच नव्हे तर आरोपीचा पीडितेच्या लहाण बहिणीवरही डोळा होता. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने सर्व प्रकार आईला सांगितला आणि प्रकरणाचा फांडाफोड झाला. पीडिता आणि तिच्या आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली.