Nagpur Crime: ढाब्यावर जेवणावरून वाद, ट्रक चालकाची निर्घृण हत्या, तीन आरोपींना अटक
Death/ Murder Representative Image Pixabay

Nagpur Crime:  नागपूर (Nagpur) येथे ढाब्यावर जेवणावरून वाद  झालेल्या एका ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नागपूरच्या मौदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. ढाब्यावर जेवणवरून झालेल्या किरकोळ वाद झाला होता. यावरून ढाबा मालक आणि त्याचे इतर सहकारी मिळून ट्रक चालकाची हत्या केली. मौदा पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. (हेही वाचा- दीड लाखाची सुपारी देऊन पतीची हत्या, आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद वसंतराव पंधरे असं हत्या झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. ३० जानेवारीच्या रात्री गुमथळा येथील हल्दीराम कंपनीत ट्रक भरण्याकरीता आले होते. दरम्यान प्रफुल पौनिकर यांच्या ढाब्यावर थांबले. रात्री जेवण करण्यासाठी ढाब्यावर थांबले होते. परंतु ढाबा बंद असल्याने जेवण मिळणार नाही असं प्रफुल यांनी सांगितले. ट्रक चालक अरविंदने प्रफुलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये चांगलेच वाद झाले. वाद टोकाला गेला आणि रागाच्या भरात ट्रक चालकावर चाकून सपासप वार केला. अरविंदची निर्घृण हत्या करण्यात आली.

खून लपवण्यासाठी अरविंद याचा मृतदेह पडसाळ येथील नाल्यात फेकला. दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात नाल्यात मृतदेह आढळून आल्याचा फोन आला होता. पोलिस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृताकडून खिशात चावीचा गुच्छा सापडला. मृतदेहावर  रक्ताचे डाग असल्याने मृत्यू झाल्याचा संशय आला. पोलिस या हत्येचा तपास करण्यासाठी मृताची ओळख पटवून घेतली. पोलिसांनी सशंयिताचा शोध घेण्यास सुरु केला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि तीन आरोपींना अटक केली.