महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समीत ठक्कर याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता समीत ठक्कर याला नागपूर कोर्टाने जामिन दिला आहे. मात्र जामिन मंजूर झाल्यानंतर त्याला लगेच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आता उद्या समीत ठक्कर उद्या मुंबईत दाखल होणार आहे.(मुंबई: अंधेरी मध्ये पोलिसांची पब, बार वर धडक कारवाई; कोविड 19 लॉकडाऊन नियम उल्लंघनाचा ठपका ठेवत 196 जणांना अटक)
समीत ठक्कर हा नागपूर येथील रहिवासी आहे. त्याने उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील एक ट्विट केले होते. याच कारणास्तव त्याला 24 ऑक्टोंबर रोजी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. समीत ठक्कर याने सोशल मीडियात आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन असे म्हटले होते. त्याचसोबत ठाकरे सरकारवर सुद्धा त्याने हल्लाबोल केला होता.त्यामुळे शिवसैनिकांनी समीत याच्या विरोधात 12 ऑगस्टला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याला अटक केली गेली.(Girish Mahajan: जळगाव येथे एका कार्यकर्त्याकडून भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल)
Maharashtra: Sameet Thakkar was later arrested by Mumbai Police. He will be produced before a Nagpur court for transit remand & will be brought to Mumbai tomorrow. https://t.co/pTKVloISfc
— ANI (@ANI) November 2, 2020
समीत ठक्कर याला ट्विटरवर 60 हजार लोक फॉलो करतात. तसचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अन्य काही बडे नेते मंडळी सुद्धा त्याचे फॉलोअर्स आहेत. व्हिएमवी कॉलेजमधून त्याने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले असून त्याच्या कुटुंबाचा नागपुरात ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. तर त्याचा राजकरणात कोणताही सक्रिय सहभाग अद्याप नाही आहे. मात्र कधी काळी त्याचे काका हे शिवसेनेत स्थानीय नेते होते.