BJP | (File Image)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. या प्रकरणावरून भाजप- शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. यातच नागपूर (Nagpur) येथील भाजप नेते आणि कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्याविरोधात विनयभंग (Molestation) आणि अॅट्रासिचीचा (Atrocities) गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. एका जमीन भूखंडाच्या वादात एका महिलेला धमकावणे व अश्लील शिवीगाळ करणे असा आरोप मुन्ना यादव यांच्यावर आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेने प्रमोद डोंगरे नावाच्या व्यक्तीसोबत पांडुरंग नगर येथे 12 लाखांचा जमिनीचा व्यवहार केला होता. ही जागा सीनू होरो नावाच्या व्यक्ती असून तो झारखंडचा रहिवासी आहे. सीनू होरो याने प्रमोद डोंगरे याला आपले घर विकण्याचा अधिकार दिला होता. दरम्यान, या महिलेने प्रमोदला 6 लाख रुपये देत घराच्या रजिस्ट्रीबाबत प्रमोद यांच्याकडे आग्रह केला. परंतु, प्रमोद यांनी रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली. याचदरम्यान प्रमोद यांनी याच भूखंडाचा व्यवहार राजवीर यादव यांच्यासोबत केला. राजवीर यादव हा मुन्ना यादवचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुन्ना यादव याने पीडिते महिला आपल्या संपर्क कार्यालयात वाद सोडवण्यासाठी बोलावले. पण हा वाद आणखी पेटला. त्यावेळी मुन्ना यादव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. हे देखील वाचा- सातारा: शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं राजकारण पोहोचले विकोपाला

पूजा चव्हाण प्रकरणावरून भाजपने शिवसेनेच्या नाकी नऊ आणले होते. मात्र, याचपार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यावर एका महिलेचा विनंयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याचमुद्द्यावरून शिवसेना भाजपला धारेवर धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या प्रकरणात शिवसेना काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.