Nagpur Accident: नागपुरात भीषण अपघात, भरधाव ट्रकची बाईकला धडक, घटनेत दोघांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

Nagpur Accident: नागपूरात (Nagpur) भरधाव ट्रकची दुचाकीला धडक लागल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमी मुलगी खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. हा अपघात वर्धा मार्गावर जामठा शिवारात बेलेजा सर्व्हिस सेन्टर समोर शनिवारी घडला. या अपघातात पत्नी आणि पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. एका त्यांच्या १३ वर्षीय मुलगी जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आजारी असल्याने तिला दवाखान्यात घेऊन जात असताना हा अपघात घडला आहे. दिलीप डोमाजी लेंडे आणि सारिका दिलीप लेंडे या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहे. लावण्या असं या दाम्पत्याच्या मुलीचे नाव आहे. सकाळी १०च्या सुमारास तिला दवाखान्यात नेताना ही घटना घडली. जामठा शिवारात बेलेजा येथेून जाताना सर्व्हिस सेंटर जवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकी ७०० मीटरपर्यंत फरफटत गेली. याच पत्नी आणि पतीचा जागीच मृत्यू झाला. लावण्या ही गंभीर जखमी झाली. हा अपघात पाहून स्थानिकांनी आरडाओरड केला. लावण्या रक्तबंबाळ झालेली पाहून स्थानिकांनी तिला उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा- जालना महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस पुलावरुन खाली कोसळली

या अपघाताची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. अपघातस्थळी पोलिस आले आणि त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे परंतु ट्रक चालक घटनास्थळावरून फरार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलिसांची चौकशी सुरु आहे.