मुस्लिम आरक्षणावरुन नवाब मलिक यांच्यावर मुख्तार अब्बास नकवी यांची टीका- किती राज्यांनी असे करुन लोकांना मुर्ख बनवलेय
मुख्तार अब्बास नक्वी (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी सरकार मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयानंतर जोरदार विरोध सुरु झाला आहे. तर केंद्रीय मंत्री मुख्तार नकवी (Mukhtar Abbas Naqvi)  यांनी मीडियासोबत बातचीत करताा नवाब मलिक यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा विचार करावा की अशा किती राज्यांनी असा प्रकारचे आश्वासन देत मुर्ख बनवले आहे. परंतु जेव्हा प्रकरण कोर्टात जाते ते तेथेच अडकून राहते. कारण घटनात्मकपणे आपण कोणालाही धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकत नाही.

मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणाबाबत प्रतिक्रिया मुख्यात अब्बास नकवी यांनी देण्यापूर्वी विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विरोध केला होता. त्यांनी असे म्हटले की, बाबा साहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानात धर्मच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही आहे. तरीही धर्माच्या आधारवर आरक्षण देण्याबाबत बोलले जात आहे. फडणवीस यांनी असे ही म्हटले की, जर मुस्लिमांना अतिरिक्त आरक्षण दिल्यास मागासवर्गीयांना आरक्षणाचा संपूर्ण लाभ घेता येणार नाही.(धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्यास मराठा, ओबीसी समाज अडचणीत येईल- देवेंद्र फडणवीस)

मुंबईत सुरु असणाऱ्या महाराष्ट्र सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लिमांच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांसाठी 5 टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा सुद्धा आज मलिक यांनी मांडला. या मुद्द्यांवरून बोलत असतानाच मलिक यांनी पूर्व भाजप सरकारवर ताशेरे ओढण्याची संधी सुद्धा हेरली. यापूर्वीच्या सरकारने म्हणजेच भाजपने जरी मुस्लिमांना आरक्षण दिले नसले तरी आमचे महाविकासआघाडी सरकार हे काम पूर्ण करणार आणि महाराष्ट्राचे अर्थसंल्प अधिवेशन संपण्याच्या आधीच याबाबत निर्णय घेतला जाईल असे मलिक यांनी म्हटले होते.