Ahmednagar: सांभाळायचा कंटाळा आला म्हणून पोटच्या मुलांकडून वडिलांची हत्या, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

सांभाळायचा कंटाळा आला म्हणून पोटच्या मुलांनीच आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोन्ही भावांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वडील दररोज दारु पिऊन घरी आल्यानंतर भांडण करतात. तसेच त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. या सर्व गोष्टींचा कंळाला आल्याने आरोपींनी वडिलांची हत्या केली असल्याचे पोलीस चोकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

दशरथ सुखदेव माळी (वय, 60) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरथ दारूचे व्यसन होते. तसेच दररोज दारू पिऊन आल्यानंतर ते आपल्या मुलांना शिवीगाळ करायचे. दरम्यान, दशरथ बुधवारी नेहमी प्रमाणे दारु पिऊन घरी आले आणि आपल्या मुलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. मात्र, यावेळी राग अनावर झाल्याने रामदास माळी (वय, 25) आणि अमोल माळी (वय, 18) या दोन्ही मुलांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दशरथच्या यांचा गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: गडचिरोली येथे पोलिसांकडून 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या हत्येत त्यांची मदत करणाऱ्या सुनेसह मोठ्या भावाच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी निकीत महाले अधिक तपास करत आहेत.