
एका महिलेची हत्या (Murder) करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गवतात फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना भिवंडी (Bhiwandi) येथील धामणगावच्या परिसरात शनिवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेची अद्यापही ओळख पटलेली नसल्यामुळे तिच्या नातेवाईकांचा स्थानिक पोलीस शोध घेत आहेत. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण भिवंडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे
मुंबई नाशिक महामार्गावरून धापसीपाड्याकडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्यावरील गवतात एक 30- 35 वयातील महिलेचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची उंची साधारणात: पाच ते साडेपाच फूट आहे. तिच्या अंगावर पोपटी व काळ्या रंगाचा पट्ट्या असलेली साडी तर, पोपटी रंगावर काळ्या रंगाचे ठिपके असलेले ब्लाऊज आहे. तसेच या महिलेच्या उजव्या हातावर इंग्रजीत आशु असे लिहलेले आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Suicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना
भिवंडीत गेल्या दोन आठवड्यापूर्वी एका 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शेलार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आकाश यांच्या डोक्यात धारदार शस्राने वार करण्यात आले होते. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पडघा ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुरेश मनोरे यांनी दिली होती. तसेच याप्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे, असेही ते म्हणाले होते.