
Mumbai Rain Alert: सध्या राज्यभरात अनेक ठिकामी तापमानाचा पारा वाढलेला आहे. अशातचं आता मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. हवामान खात्याने (IMD) आज मुंबई शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली (Mumbai Rain Prediction) आहे. याशिवाय, संपूर्ण आठवडाभर ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे तीव्र उन्हापासून नागरिकांना काही प्रमाणात आराम मिळेल.
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज, 5 मे रोजी मुंबईत शहरात पाऊस आणि गडगडाटासह वादळे येतील. मे महिन्याच्या सुरुवातीला आकाश ढगाळ राहिल. सकाळी 9 वाजता, वारे ताशी सुमारे 5 किमी वेगाने वाहतील, आर्द्रता 75% राहील आणि तापमान 29 अंश सेल्सिअस राहील, ज्यामुळे आज शहरात सौम्य वारे वाहतील. तसेच दिवसा तापमानात वाढ दिसून येईल. (हेही वाचा - Yellow Alert in Mumbai: आयएमडी कडून मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला 6-7 मे दिवशी यलो अलर्ट)
Daily Weather Briefing English (04.05.2025)
YouTube : https://t.co/ulM3ZNXHt6#imd #india #rain #weatherupdate #weatherforecast #Rainfall #mausam #thunderstorm #hailstorm #heatwave@moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/o56SNdfcTI
— India Meteorological Department (@Indiametdept) May 4, 2025
मुंबईचे आजचे तापमान -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईत ढगाळ आकाश आणि दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज शहरात तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल 32 अंश सेल्सिअस राहील. तथापि, 6 मे रोजी मुंबई शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. मंगळवारी तापमान किमान 25 अंश सेल्सिअस ते कमाल 31 अंश सेल्सिअस राहील.
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक -
दरम्यान, सीपीसीबीच्या अहवालानुसार मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 54 आहे. जो 'समाधानकारक' हवेची गुणवत्ता दर्शवतो.