
दिवसरात्र काम करणारी आणि घड्याच्या वेगाने धावणारी लोक अशी मुंबईची खास ओळख आहे. त्यामुळे कामाच्या व्यापात पार गढून गेलेल्या व्यक्तींना सुट्टी घेण्यासही फुसरत मिळत नाही.
एका ट्रॅव्हल पोर्टल एक्सपीडियाने मुंबईकर हे सर्वात कमी सुट्ट्या घेतल्याचे त्यांनी केलेल्या सर्व्हेच्या अहवालातून सांगितले आहे. तर या सर्व्हेनुसार मुंबईतील 51 टक्के नागरिक कामाचा व्याप जास्त असल्याने सुट्टीच घेत नाहीत.या उलट 40 टक्के नागरिकांना कामामधून भरपुर पैसे कमवायचे असतात म्हणून सुट्टीच घेत नसल्याचे दिसून आले आहे.
जगभराच्या सुट्ट्यांच्या तुलनेत 27 टक्के मुंबईकरांनी गेल्या वर्षी सुट्टीच घेतली नाही. तर 44 टक्के मुंबईकरांनी 10 दिवसापेक्षा कमी दिवस कामामधून सुट्टी घेतली आहे. मात्र या प्रकरणी दिल्लीचा दुसरा क्रमांक असून 43 टक्के लोकांनी 10 दिवसांपेक्षा कमी दिवस सुट्टी घेतली होती असे सर्व्हेच्या माध्यमातून उघड झाले आहे. परंतु आरोग्याच्या समस्येबाबत मुंबईकर जास्त प्रमाणात सुट्ट्या घेत असल्याचे ही समोर आले आहे.