
सध्या मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी खुली असली तरीही मागील 3 महिन्यांत तिसर्यांदा रेल्वे कर्मचारी एका भामट्याला पकडताना ट्रेनमधून तोल जाऊन खाली पडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये रेल्वे कर्मचारी धावत्या ट्रेनमधून पडल्याने त्याच्या मणक्याला मोठी दुखापत झाली आहे. दरम्यान 12 तासांतच आरोपी पकडला गेला असला तरीही त्याला ट्रेनमध्ये प्रवेश कसा मिळाला हा प्रश्न सतावत आहे.
विरार - चर्चगेट ट्रेन मध्ये हा प्रकार घडला आहे. 30 वर्षीय पश्चिम रेल्वेची ज्युनियर इंजिनियर सेकंड क्लास मधून प्रवास करताना हा प्रकार घडला. या तरूणीला 5 वाजताची ड्युटी होती. पण दादर स्थानकात 4.40 च्या सुमारास भामटा तरूण लेडीज डब्ब्यात चढला. तरूणी पाठमोरी उभी होती, फोनवर काहीतरी करत होती. ट्रेन जशी सुरू झाली तसा त्याने फोन खेचला. त्या मुलीने देखील चोरामागे धावण्याचा प्रयत्न केला पण ट्रेनने तो पर्यंत वेग पकडला असल्याने ती पाठीवर पडली.
एका प्रत्यक्षदर्शीने तातडीने तिला मदत करत हॉस्पिटल मध्ये नेले. सध्या या तरूणीच्या मणक्याला सूज असून ती पाठीवर झोपू देखील शकत नसल्याचं तिच्या डॉक्टर भावाने TOI सोबत बोलताना म्हटलं आहे. Mumbai: लोकल ट्रेनमध्ये प्रवाश्याला ठार मारल्याप्रकरणी 23 वर्षीय व्यक्तीला अटक; रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
पोलिसांनी दादर स्टेशन मधील सीसीटीव्ही फूटेज पाहून आणि तरूणीचा जबाब घेऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. दादरच्याच भवानी शंकर रोड परिसरात एका वस्तीत त्याचा शोध लागला. तो 25 वर्षीय आहे. तरूणीचा फोन विकून त्याने 17 हजार कमावले. त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल केला असून तो या प्रकरणामध्ये दोषी आढळला तर त्याला 10 वर्ष शिक्षा होऊ शकते.