मुंबई:  लैंगिक छळ करत नग्न फोटो काढल्याप्रकरणी पीडित महिलेची पोलिसात धाव, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई (Mumbai) मधील वरळी येथे राहणाऱ्या एका महिलेने नवरा घराच्या खोलीत नग्न फोटो काढून लैंगिक छळ करत असल्याप्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे. तसेच सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला डॉक्टर ही कर्नाटकमधील असून नवऱ्यासोबत वरळी येथे राहते. 2013 मध्ये तिचा रित्विर हेगडे या पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तिसोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्याने बायकोचे घरातच नग्न फोटो काढत तिचा लैंगिर छळ करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे.(वांद्रे: लग्न समारंभावेळी नववधुच्या मैत्रीणीकडून 7 लाख रुपयांचा सोन्याच्या हारावर डल्ला, पोलिसांकडून अटक)

तसेच पीडित महिलेला सासरची मंडळी मारहाण आणि शिवीगाळ सु्द्धा करत असल्याचे तिने सांगितले आहे. तर नग्न फोटो फक्त पतीच नाहीतर घरातील इतर मंडळीसुद्धा काढत ते छळ करत असल्याचे स्पष्टीकरण पीडित महिलेने पोलिसांना दिले आहे.