Representational Image (Photo: Twitter)

मेहूण्याच्या मदतीने आपल्या भावाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बहिणीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना मुंबई (Mumbai) येथील चेंबूर (Chembur) परिसरात घडली. आरोपी महिलेचा भाऊ अमली पदार्थांचे सेवन करत असे. एवढेच नव्हेतर, आमली पदार्थांचे सेवन करुन घरी परतल्यानंतर तो कुटुंबियातील सदस्यांना मारहाणदेखील करत असे. याला वैतागून आरोपीने मेहूण्याच्या साथीने आपल्या भावाची हत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी बहिणीसोबत तिच्या पतीलाही अटक केली असून अधिक चौकशी करत आहे.

देवेंद्र आखाडे असे मृत तरुणाचे नाव असून तो आमली पदार्थांच्या आहारी गेला होता. देवेंद्र हा आमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर नेहमी परिवारातील सदस्यांना मारहाण करत असे. गेल्या आठवड्यात रविवारी देवेंद्र नेहमीप्रमाणे आमली पदार्थांचे सेवन करुन परिवारातील सदस्यांना मारहाण करु लागला. नेहमीच्या या त्रासाला वैतागून आरोपी रेश्मा सुशील ओव्हाळ हिने आपल्या मेहूण्याच्या साथीने देवेंद्र याच्या गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेह भिमवाडी रेल्वे रुळावर नेऊन फेकले. मालवाहू रेल्वे रुळावर मृतदेह आढळ्याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील चौकशी सुरुवात केली. हे देखील वाचा- बुलढाणा: घरात सापडला दिव्यांग महिलेचा विवस्त्र मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

पीटीआयचे ट्विट-

मंगळवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना चौकशीत रेश्मा हिच्यावर संशय आल्याने तिच्याकडून अधिक चौकशी केली. रेश्मा आणि तिच्या मेहूण्याच्या मदतीने देवेंद्र याची हत्या केल्याचे चौकशीतून उघड झाले. दोघांनाही आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.