No Honking Day

No Honking Day: ध्वनी प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नियंत्रित करण्यासाठी, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी 9 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी वाहनचालकांमधील हॉर्नच्या अनावश्यक वापराच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी 'नो हॉर्निंग डे' जाहीर केला आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मंगळवारी दिली आहे.

"अनावश्यक हॉर्न वाजवल्याने वातावरणात ध्वनी प्रदूषण होते आणि त्याचा मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. आम्ही वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचे हॉर्न न वाजवून 'नो हॉर्निंग डे'ला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन करतो," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विनाकारण हॉर्न वाजवल्या त्याच्यावर मोटार वाहन कायदा 19 एफ अंतर्गत कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांनी या नियमांचे पालन करायला आवाहन दिले आहे. मुंबईकरांना अनावश्यक हॉर्निंगच्या विरोधात मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.