मुंबई: 'सोलर पॉवर' वापरुन पश्चिम रेल्वेने केली 3 कोटी रुपायांची बचत
Mumbai Western Railway | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबई पश्चिम रेल्वेने (Mumbai Western Railway) दावा केला आहे की त्यांनी आपल्या श्रृंखलेत असलेल्या 75 स्टेशन्सवर सोलर पॉवर (Solar Power) वापर केला. ज्यामुळे पश्चिम रेल्वेला (Western Railway) सुमारे 3 कोटी रुपये इतकी विजेची बचत करता आली. एका अधिकाऱ्याने माहती देताना बुधवारी (2 ऑगस्ट) सांगितले की, पश्चिम रेल्वेने एक रुफटॉप सोल प्लांट 8.67 मेगावॅट इतकी विजनिर्नीती करते. ज्यामुळे संपूर्ण वर्षभरात विजेची चांगलीच बचत होते. या शिवाय 2030 पूर्वी नेट झिरो कार्बन एमिसन रेल्वे' हे लक्ष्य साध्य करण्यासाठीही याची मोठी मदत होणार आहे.

मुंबई शहरातील 22 स्टेशन्स, रतलाम येथील 34 स्टेशन्स, राजकोट येथील 8 स्टेशन, वडोदरा येथील 6 स्टेशनांवर सोल पॉवर लावण्यात आले आहेत. याशिवाय अहमदाबाद आणि भावनगर येथेही हे स्टेशन लावणयात आले आहेत. (हेही वाचा,कोरोना व्हायरसच्या काळात पश्चिम रेल्वेचे 1,770 कोटी रुपयांचे नुकसान )

मुंबईमध्ये चर्चगेट, मुंबई सेंट्रल टर्मिनस, दादर टर्मिनस, बांद्रा टर्मिनस आणि ठाणे, पालघर अशाही काही स्टेशन्सवर रुफटॉप पॉवर प्लांट लावण्यात आले आहेत. रेल्वे अधिकाऱ्याने अधिक माहिती देताना सांगितले की, 2030 पर्यंत भारतीय रेल्वेने 33 अब्ज यूनिट्ससाठी सर्व उर्जा पूर्ततेसाठी सोलल पावर उत्पादन वाढविण्याचे ठरवले आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या 51,000 हेक्टर रिकाम्या जागेवर आणि अतिक्रमण नसलेल्या जमीनीवर 2030 पर्यंत 20 गीगावॅट इतके सोल प्लांट उभारण्याची योजना तयार केली आहे.