
कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. याच दरम्यान आता पश्चिम रेल्वेचे (Western Railway) कोरोना व्हायरसच्या महासंकटकाळात तब्बल 1770 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात 261 कोटी रुपये उपनगरीय आणि 1509 कोटी नॉन-उपनगरीय यांचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे नव नियुक्त चीफ स्पोकपर्सन सुमीत ठाकूर यांनी म्हटले आहे.(मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार 40 अधिक लोकल फेर्या)
पश्चिम रेल्वेचे झालेले नुकसान बाजूल ठेवल्यास प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे रिफंड ही देण्यात आलेले आहेत. तर प्रवाशांनी 2 मार्च ते 17 जुलै दरम्यान तिकिट रद्द केल्याने त्यांना 397 कोटी रुपये रिफंट म्हणून नागरिकांना रेल्वेकडून देण्यात येणार आहे.तर फक्त एकट्या मुंबईतील प्रवाशांसाठी तब्बल189 कोटी रुपयांचे रिफंड दिले जाणार आहे. आतापर्यंत 61 लाख प्रवाशांनी तिकिट रद्दल केली आहेत. परंतु प्रवाशांना त्यांच्या तिकिटांनुसार रिफंड दिले जात असल्याचे ही ठाकूर यांनी सांगितले आहे.(Post COVID Indian Railway Coach ची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून झलक; तांब्याचा मुलामा असलेले हॅन्डल ते प्लाझ्मा एअर प्युरिफिकेशन असं असेल रेल्वेच्या डब्ब्यांचं नवं रूप)
दरम्यान, सध्या कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी फक्त रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीपासून ट्रान्स हार्बर मार्गाने सुद्धा रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. तर 29 जून पासून पश्चिम रेल्वे मार्गावर अधिक 40 नव्या फेऱ्या चालवल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर याआधीपासूनच सुमारे 162 ट्रेन्स चालवल्या जात आहेत. पण अद्याप त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा नाही. सध्या केवळ शासनाकडून परवानगी असलेल्या कर्मचार्यांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. परंतू वाढती गर्दी पाहता आता पश्चिम रेल्वे मार्गावर काही ट्रेन्स वाढवल्या जात आहेत.