Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

चर्चगेट ते वसई (Churchgate To Vasai), विरार आणि डहाणू रेल्वे स्टेशनपर्यंत सेवा देणारी मुंबई पश्चिम रेल्वे (Mumbai Western Railway) 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, विलेपार्ले रेल्वे स्टेशन (Vileparle Railway Station) फलाट क्रमांक 4 वर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हा विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रवाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विलंबाबाबत एकमेकांना माहिती देत आहेत. पश्चिम रेल्वेने मात्र या विलंबाबात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.

दरम्यान, या वाहतूक दिरंगाईबद्धल रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. स्टेशनवर मात्र प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे वाहतूकीत दिरंगाई होत असल्याने प्रवासी संतापले आहेत. रेल्वे गाड्या वेळेवर धावाव्यात गाड्यांचे वेळापत्रक कोलमडू नये यासाठी रेल्वे प्रशासनही चांगले प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला अद्याप तरी यश येताना दिसत नाही. (हेही वाचा, मुंबई: मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे रडगाणे पाचव्या दिवशीही सुरुच, प्रवाशांचे हाल, स्थानकांवर गर्दीच गर्दी)

सकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.