Western Express Highway (PC - ANI)

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोडींचा (Mumbai Traffic Jam) सामना करावा लागत आहे. अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Expressway) आज सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्याने पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती. या सर्वामुळे मुंबईत वाहन चालकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. (हेही वाचा - Pune Crime News: पुणे पोलिसांकडून Lamborghini कारसह चालकाला अटक, श्र्वानाला धडक दिल्याचे प्रकरण)

14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल. मात्र काम उशिरापर्यंत सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. बोरिवलीवरुन मुंबई शहराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. अंधेरीतील हा पुल लवकरच सुरु होणार असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे ही वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान सलगच्या सुट्ट्या आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर देखील मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या रांगाच रांगा पहायला मिळाल्या. यावेळी बोरघाटात प्रचंड प्रमाणावर वाहतुक कोंडी ही पहायला मिळाली आहे.