arrest

Pune Crime News: पुण्यात (Pune) फर्ग्युसन रोडवर भरधाव लॅम्बोर्गिनी (Lamborghini) कारने एका भटक्या कुत्र्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुणे पोलीसांनी या घटने संदर्भात दखल घेत त्या कार चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी गोपाळ कृष्ण गोखले चौकात घडली. या घटनेमुळे श्वान प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. पुणे पोलीसांनी व्हिडिओच्या मदतीने त्या कार चालकाला ताब्यात घेतले. सोबत आलीशान लॅम्बोर्गिनी कार जप्त केली.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी फर्ग्युसन विद्यालय परिसरात जवळ लॅम्बोर्गिनी कारने एका कुत्र्याला धडक दिली होती. धडक दिल्यानंतर कुत्र्याला कारसोबत काही दूर पर्यंत फरफटत नेलं. या घटनेचा क्षण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पुणे पोलीसांनी व्हिडिओच्या त्या कार चालकाचा शोध सुरु झाला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक फरार होता. अखेर त्या आरोपीचा शोध संपला ़ डेक्कन पोलीसांनी कारचालकाला अटक केली आहे. त्याचा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोबत त्याची आलीशान कार, जप्त केली आहे. कार चालक हा सराफी व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. कार भरधाव वेगाने चालवित असल्याप्रकरणी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.तक्रार केल्यानंतर पोलीसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ पाहून श्वानप्रेमींनी त्याच्यावर कारवाई करा अश्या प्रकारात कंमेट केले आहे.