Mumbai Weather Update: मुंबईकारांना पुढील 3 दिवस उन्हाच्या झळा बसणार, IMD चा अंदाज
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Mumbai Weather Update:  मुंबईत उन्हाचे तापमान गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून आले आहे. अशातच आता शुक्रवारी सुद्धा शहरातील तापमानाची नोंद 38.7 अंश सेल्सिअस झाल्याचे सांताक्रुझ हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान येत्या शनिवार पर्यंत उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आयएमडी कडून व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचे तापमान वाढलेले असणार आहे.(Covid 19 in Pune: पुणे शहरात नागरिकांनी नियमावलीचं पालन करणं न केल्यास 2 एप्रिल नंतर नाईलास्तव 'लॉकडाऊन' सारखा कडक निर्णय घ्यावा लागेल; अजित पवारांचा इशारा)

मुंबई IMD चे प्रमुख केएस होसाळीकर यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, मुंबईसह कोकणात 27 तारखेपासून पुढील 3 दिवस उन्हाच्या तापमानात वाढ होणार आहे. तर आयएमडीनुसार, कोकोणातील दाटीवाटीच्या ठिकाणी उन्हाचे तापमान अधिक असणार आहे. तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.(Power Cuts in Parts of Central Mumbai: फीडर ट्रिपिंगमुळे मध्य मुंबईत काही ठिकाणी वीज कपात)

Tweet:

दरम्यान, शुक्रवारी आयएमडी सांताक्रुज यांनी 38.7 डिग्री अंश सेल्सिअस तर कुलाबा हवामान खात्याने किमान तापमान 36.7 डिग्री सेल्सिअस नोंद केली आहे.  त्याचसोबत पश्चिम उपनगरीय विभागात तापमान 22.4 डिग्री अंश सेल्सिअर तर कुलाब्यातील 24.5 डिग्री अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.