मुंबई मध्ये काल रात्री झालेल्या पावसानंतर आता आयएमडी मुंबई (IMD Mumbai) ने 9 जुलै साठी मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई मध्ये अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबई मध्ये झालेल्या पावसाने आज जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईच्या आयएमडी चे डिरेक्टर Sunil Kamble यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्री 2 ते पहाटे 6 पर्यंत 270 मीमी पाऊस झाल्याची माहिती दिली आहे. पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट करत अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं म्हटलं आहे. तर उद्यासाठी यलो अलर्ट आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई मधील पावसाचा अंदाज घेत
कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने स्थानिक मनपा कर्मचाऱ्यांनी देखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करावे असेही निर्देश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. Powai Lake Overflows: मुंबई मध्ये मुसळधार पावसानंतर पवई तलाव पूर्ण भरून वाहण्यास सुरूवात (Watch Video).
मुंबई मधील उद्याचे हवामान
मुंबई मध्ये आज झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे, रस्ते सह हवाई वाहतूक देखील रखडली होती. आज शाळा, कॉलेजला देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे