Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon 2019:  मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर या पश्चिम सागरी किनार्‍यावर मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजही (7 ऑगस्ट) रायगड आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस बसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई, कोकणासह पुणे, कोल्हापूर, सांगली या भागामध्येही पावसाचा जोर कायम आहे. मागील दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूरात होत असलेल्या धुव्वाधार पावसामुळे विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर आणि कोकणात पावसाने कहर केल्याने मागील काही दिवसांपासून या भागामध्ये शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर मध्ये सुरक्षा कारणास्तव उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

ANI Tweet

हवामान खात्याने यापूर्वीच दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन महिन्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार 100% पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.