Mumbai Weather Prediction, August 09:आज मुंबईत मध्यम पावसासह सामान्यतः ढगाळ आकाशाची अपेक्षा आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. बुधवारी म्हणजे काल लाही ठिकाणी महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला,व मुंबईत सध्या पावसाने सुट्टी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत काल दिवसभर काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडला. मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत 1.1 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेने या कालावधीत केवळ 0.1 मिमी पावसाची नोंद केली. आज महाराष्ट्रात भरपूर जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी करण्यात अल आहे ज्यामध्ये रायगड,रत्नागिरी,धुळे,जळगाव,नाशिक,पुणे,सातारा,बीड,अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली नागपूर आणि भंडार.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज
8 ऑगस्ट: मध्यम पावसासह सामान्यतः ढगाळ आकाशाची अपेक्षा करा. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.
9 ऑगस्ट: मध्यम पावसासह आकाश सामान्यतः ढगाळ राहील. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
10 ऑगस्ट : दिवसभर पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
11 ऑगस्ट : पाऊस सुरूच राहणार आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.