Mumbai Weather Prediction, August 08: मुंबईत आज हवामान खात्याने ढगाळ वतावरणास हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. किमान तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल 32 अंश सेल्सिअस पर्यंत असेल. काही दिवसा पूर्वी पडणारा मुसळधार पाऊस काल आणि आजच्या दिवसात कमी झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी हवामानाचा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी आणि घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे. अनेक जिल्ह्यांच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज आहे.मुंबईत आता येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, पण वातावरण मात्र ढगाळ राहील.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
IMD आज अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ.
8 ऑगस्ट: मध्यम पावसासह सामान्यतः ढगाळ आकाशाची अपेक्षा करा. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.
9 ऑगस्ट: मध्यम पावसासह आकाश सामान्यतः ढगाळ राहील. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
10 ऑगस्ट : दिवसभर पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
11 ऑगस्ट : पाऊस सुरूच राहणार आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.