Mumbai Weather Prediction, July 31: मुंबईत व उपनगरात आज दिवसभर ढगाळ वतावरणस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये म्हटले आहे की, शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांत ढगाळ आकाश राहील आणि शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर मुंबई आणि पालघरसाठी कोणताही इशारा नाही.IMD च्या मुंबई हवामान अद्यतनानुसार, कुलाबा वेधशाळेत 1 जूनपासून 1882 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ वेधशाळेने याच कालावधीत 2012.5 मिमी पावसाची नोंद केली आहे.मान्सूनचा जोर सध्या तीव्र नाही, त्यामुळे मुंबईत जोरदार पाऊस होणार नाही. मात्र, नैऋत्य आणि पश्चिमेचे वारे वाहत राहतील. त्यामुळे मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे मुंबईतील आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी रविवारी दुपारी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Pune Weather forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.उर्वरित ईशान्य भारत, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, या भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.