Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Photo Credit: Pixabay

Mumbai Weather Prediction, July 11 : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे मुंबईत आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम सवरूपचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यते नुसार आज मुंबई आणि उपनगरात दिवसभर मधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज 10 जुलै 2024 रोजी तापमान 28.19 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25.99 °C आणि 28.43 °C दर्शवतो. सोमवारी अवघ्या सहा तासात 300 मिमीहून अधिक पाऊस झाल्यानंतर, देशाच्या आर्थिक राजधानीत मंगळवारी सकाळपासून अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. आज बुधवारी सकाळी आकाश ढगाळ झाले होते आणि शहराच्या काही पश्चिम भागात हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत, बेट शहरात सरासरी 3.42 मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व आणि पश्चिम भागात अनुक्रमे 6.06 मिमी आणि 3.83 मिमी पाऊस पडला, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान विभागने मुंबईत उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai High Tide Timing Today: भरतीच्या वेळी समुद्रात 4.19 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता; बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती

मुंबईत उद्याचे हवामान कसे? 

आज पासून पुढील 5 दिवस गोवा,कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. व आज गोवा मध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्ककतेचा इशारा देण्यात आले आहे . हवामान खात्याच्या अंदाज नुसार पुढील 5 दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बिहार, दिल्ली आणि उतार प्रदेश मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वेस्ट बंगाल, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि मेघालयात आज मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यात आहे.