Weather Forecast & Monsoon 2023 Updates: मान्सून मुंबईत बरसणार, पण कधी? हवामान विभागाने तारीखही सांगितली; घ्या जाणून
Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Monsoon 2023  updates:  मान्सून लांबणीवर पडल्याने जून महिन्याचा मध्यंतर आला तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाऊस केव्हा पडतो आणि उकाड्यापासून केव्हा एकदा सुटका होते याकडे मुंबईकर डोळे लावून बसले आहेत. खरे तर जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून (Mumbai Monsoon) बरसू लागतो. मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु होते. यंदा मात्र काहीसे आक्रीत घडले. पावसाने मुंबईकडे पूर्णपणे पाट फिरवली आहे. त्यामुळे सर्वांनाच मान्सूनची आतूरता लागून राहिली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) मात्र खूशखबर दिली आहे. येत्या शनिवार, रविवारपर्यंत मुंबईत मान्सून बरसण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.

बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांनी यांनीही हवामान विभागाच्या माहितीचा दाखला देत म्हटले आहे की, पवसाचा अंदाज पाहून मुंबई शहरात पाणीकपात करायची किंवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांच्याकडे हायड्रोलिक्स विभागाचे प्रभारी पद आहे. दरम्यान, जून अखेरपर्यंतही पावसाने हजेरी लावली नाही तर मात्र जुलैच्या सुरुवातीपासून पाणीकपात (Water Cut) करावी लागू शकते, असे म्हटले आहे. (हेही वाचा, Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून)

IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात मटा ऑनलाईनने म्हटले आहे की, पश्चिमी वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मान्सून पावसाला अनुकुल अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी येत्या 23 जून पर्यंत शहरात मान्सून बरसू शकेल. तसेच, पुढच्या काहीच दिवसांमध्ये म्हणजेच 27 ते 28 जून रोजी शहरात दमदार पावसाची अपेक्षा आहे.

जून, जुैल महिन्यात होणाऱ्या पावसामध्ये मुंबईला पाणिपुरवठा करणाऱ्या तलवांचा पाणीसाठा वाढतो. या दोन महिन्यात मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा धरणात जवळपास पूर्ण होतो. यंदा मात्र हे चक्र काहीसे बदलले आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली आहे. पुढचे काहीच दिवस पुरेल इतका पाणीसाठी धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांसोबतच प्रशासनाचे डोळेही ढगांकडे लागले आहेत.