Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

यंदा मान्सून मुंबईत (Mumbai) 13 जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलसाठ्याचे प्रमाण अधिक कमी होणार आहे. तर सध्या पाण्याची पातळी कमी झाली असून तलाव क्षेत्रात 10 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.

पाऊस मुंबईत दाखल होण्यासाठी वेळ लागल्यास पाणी पुरवठ्याचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तर ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये म्हणून महिलेकडून त्यासाठी नियोजन सुरु करण्यात आले आहे.(आटलेली विहीर अजून खोदली, आता तासाला एक घागर पाणी; 2 हंडा पाण्यासाठी महिला रात्रभर रांगेत)

मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांमधून मुंबईतील शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या जलसाठ्यात 10 टक्के पाणी शिल्लक राहिल्याने मुंबईत पाणी कपात करण्यात आली आहे.