Mumbai Water Level Updates: मुंबई मध्ये 7 तलावात मिळून मागील 3 वर्षातील निच्चांकी केवळ 37.9% पाणीसाठा
Water | PC: Pixabay.com

मार्च (March) महिन्याच्या मध्यात आता उन्हाच्या झळा तीव्र होत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं तळ गाठत आहेत. नव्या आकडेवारीनुसार आता मुंबईचा पाणीपुरवठा (Mumbai Water Level ) केवळ 37.9% शिल्लक आहे. हा मागील 3 वर्षांतील निच्चांकी जलसाठा आहे. मात्र असे असूनही पालिका प्रशासनातील अधिकार्‍यांच्या माहितीनुसार नागरिकांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नसल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकार कडून त्यांच्या साठ्यातील 15.76% पिण्याचे पाणी मुंबईला द्यावं असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मागील वर्षी याच दिवशी मुंबईच्या तलावात सुमारे 44% पाणीसाठा होता. यंदा हा साठा 37.9 % झाला आहे. तर 2022 मध्ये हाच पाणीसाठा 46.5% पर्यंत खाली गेला होता. P Velrasu, Additional Municipal Commissioner (Projects)यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी पूर्ण झाली असल्याने नागरिकांना तूर्तास पाणी कपातीचं टेन्शन घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. BMC New Swimming Pools: बीएमसी लवकरच खुली करणार मुंबईकरांसाठी नव्याने बांधलेले 3 स्विमिंग पूल्स; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू .

एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, यंदा पावसाळ्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी झाल्याने आणि अपेक्षेपेक्षा आधीच पावसाने माघार घेतल्याने यंदा पाणी टंचाई आली आहे. सध्या मुंबईकरांना मुंबईच्या 7 तलावांमधून उपलब्ध पाणीसाठ्यातूनच पाणीपुरवठा होत आहे पण जसा हा साठा संपेल तसे राज्य सरकार कडून मिळलेले अतिरिक्त पाणी नागरिकांना पुरवले जाईल. मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या 7 तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सात तलावांतून दररोज तीन हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.