मुंबई (Mumbai) मध्ये उद्या 2 नोव्हेंबर दिवशी 24 तासांसाठी पाणी कपात करण्यात आली आहे. यामध्ये बीएमसीच्या (BMC) सहा वॉर्ड्स मधील पाणीपुरवठ्यावर प्रभाव दिसणार आहे. पहाटे चार वाजल्यापासून पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विविध रिपोर्ट्सनुसार, बीएमसी 900 एमएम व्यासाचा वॉटर चॅनल बदलणार आहे. तसेच पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. काही ठिकाणी लिकेज असल्याने 300 एमएम ते 1800 एमएम व्यासाच्या पाईपलाईनंचेही काम हाती घेण्यात आलं आहे.
मुंबई मध्ये देवनार, चेंबूर, टिळक नगर, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, परेल, शिवडी, नायगाव आणि सायन-माटुंगा भागातील पाणीपुरवठा प्रभावित राहणार आहे. या भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. तर शिवाजी नगर, लालूभाई कम्पाऊंड, चेंबूर कॅम्प, राजवाडी ईस्ट, विद्याविहार, एलबीएस मार्ग, नेहरू नगर, कुर्ला ईस्ट, दादर ईस्ट, माटुंगा ईस्ट, वडाळा आणि चुनाभट्टी मध्येही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
केईएम, टाटा, जेरबाई वाडिया, एमजीएम हॉस्पिटल या भागामध्ये तसेच शिवडी, हिंदमाता, लालबाग, अभ्युदय नगर या भागामध्येही पाणीकपातीचा परिणाम दिसणार आहे. यापूर्वी 31 ऑक्टोबरला अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव भागामध्ये पाणीकपात होती. 15 तासांसाठी पाणीकपात होती. वर्सोवा भागामध्ये असलेल्या नव्या वॉटरलाईन सोबत त्यांना जोडण्यासाठी ही पाणीकपात करण्यात आली होती.
BMC ने मेंटेनन्स विंडो दरम्यान वेरावली 1 आणि 2 जलाशयांवर स्ट्रक्चरल ऑडिटच्या महत्त्वावर भर दिला. असंख्य उपनगरीय भागांना पाणी पुरवठा करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. प्राधिकरणाने रहिवाशांना जलस्रोतांचा विवेकपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले आहे आणि देखभालीच्या कामाच्या घालून दिलेल्या नियमांच्या कालावधीत कमी पाण्याच्या दाबाची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.