राज्यातील अवकाळी पावसामुळे भाज्या महागल्या, कोथिंबीर जुडीचे दर 80 रुपयांवर
कोथिंबीर (Photo Credits-Facebook)

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेकऱ्यांना बसल्याने त्यांच्या लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. परिणामी याचा फटका भाज्यांवर सुद्धा झाला असून त्याचे दर कडाडले आहेत. तर नाशिककरांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर तेथे भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आली. त्यानंतर आता मुंबईत सुद्धा भाज्यांच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली असून एका कोथिंबीरच्या जुडीसाठी ग्राहकाला 80 रुपये मोजावे लागत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा फटका भाज्यांवर ढाला आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिमझिम कायम असल्याचे दिसुन येत आहे. मात्र याच परिस्थितीत भाज्यांचे दर आवाक्याच्या बाहेर गेले असून सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. कारण भाज्यांचे दर मुंबईसह अन्य ठिकाणी वाढल्याची माहिती भाजी विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात कोथिंबरीची जुडी 40 वरुन आता 80 रुपये झाली आहे. तर मेथीची 20 रुपयांची जोडी 40 रुपये झाली आहेत. एवढेच नाही तर चवळी 15 रुपये किलोवर 30 रुपयांवर आली आहे.(महागाई दर कमी होऊनही पुन्हा एकदा मुंबई ठरले देशातील, तर हाँगकाँग जगातील सर्वात महागडे शहर)

पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्येच भाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबईत भाज्यांचा पुरवठा अपुरा झाल्याने त्याचा परिणाम दर वाढीवर झाला आहे. पावसाने सध्या तरी विश्रांती घेतली असली जर आणखी काही दिवस पाऊस पडला तर त्याचा परिणाम भाज्यांवर होऊन भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.