मुंबई (Mumbai) येथील वाशीनाका (Vashi Naka) परिसरात मोनोरेलची (Monorail) वाहतूक ठप्प झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर काही तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत मोनोरेल सेवा पूर्ववत होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोनोरेल ठप्प झाल्याने त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे.
सोशल मीडियात प्रवाशांकडून मोनोरेलबाबत ट्वीट करत या महिन्यात दुसऱ्या वेळेस त्याची सेवा बंद झाल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. मोनोरेलच्या अशा वारंवार प्रकारामुळे त्यावर योग्य तोडगा काढण्यात यावा असे प्रवाशांकडून म्हटले जात आहे.
Not how I envisaged my Monday morning. Travelling in the monorail, getting stuck and waiting for the fire brigade or another monorail to get us safely @Mumbaimonorail @MMRDAOfficial pic.twitter.com/0mVp0naVdQ
— ritika (@ritika24490030) September 23, 2019
मोनोरेलच्या पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा दरम्यान अद्याप काम सुरु आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मोनेरेल सेवा प्रवाशांसाठी 3 मार्च पासून सुरु करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोनेरेल चेंबूर ते महालक्ष्मी पर्यंत धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या मार्गावरील मोनोरेलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात जीटीबी नगर,अॅण्टॉप हिल,वडाळा ब्रिज, आचार्य अत्रे नगर, दादर पूर्व, आंबेकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल आणि संत गाडगे महाराज चौक ही स्थानके असणार आहेत.(खुशखबर! मुंबईत लवकरच सुरु होणार Water Taxi; प्रवासाचा वेळ होणार दीड तासावरून अर्धा तास; जाणून घ्या मार्ग)
तर आज सकाळी सुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ल्याजवळील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे अप-डाऊन मार्गावरील रेल्वे उशिराने धावत होत्या. परंतु आता मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.