मुंबई: रिक्षाची धडक लागून बाईकस्वार 25 फूट खाली वाकोला पुलावरुन कोसळला
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईतील वाकोला पूलावरुन जाणाऱ्या एका बाईकस्वाराला रिक्षाची जोरदार धडक लागल्याने 25 फूट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या मध्ये बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ओमकार देवरुखकर असे तरुणाचे नाव असून तो बाईक चालवत होता. वाकोला पूलावरुन जात असताना त्याला रिक्षाची धडक लागल्याने तो खाली फेकला गेला.

रोहित घोसाळकर असे मृत झालेल्या बाईक चालकाचे नाव असून तो वडाळा येथील रहिवाशी आहे. अपघात झाल्यानंतर रोहित याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच रोहित याचा मृत्यू झाला. पण ओमकार हा गंभीर जखमी असून त्याला अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मालाड येथे लग्नाच्या फोटोशूटसाठी गेला असता घरी येताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ज्या रिक्षाचालकाने बाईक चालकाला धडक दिली त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; टँकर आणि Swift च्या धडकेत 4 जण ठार)

तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्या गाडीला 18 डिसेंबर रात्री उशिरा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाडीचा चक्काचूर झाला आहे. काल रात्री सुमारे 11 च्या सुमारास निळजे आणि दातिवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रीजवर हा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये उड्डाणपूलावरून कार खाली थेट रेल्वे रूळावर कोसळली.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणावळा येथे पिकनिकसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.