महाराष्ट्रात आज (8 जून) पासून मिशन बिगिन अगेनच्या तिसर्या टप्प्याला सुरूवात होत आहे. आजपासून मुंबईमध्येही सरकारी आणि खाजगी कार्यालयामध्ये 10% कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये कामकाजाला सुरूवात होणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईच्या रस्त्यावर ट्राफिक जॅम पहायला मिळाला आहे. दरम्यान मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असणारी लोकल सेवा अद्याप सामान्यांसाठी सुरू करण्यात आली नसल्याने अनेकांना स्वतःची वाहनं, रिक्षा, टॅक्सी किंवा कॅब अन्यथा बेस्ट बसचा पर्याय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मुंबईकरांची गर्दी पहायला मिळाली आहे. Mission Begin Again: BEST बस सेवा उद्या पासून होणार सुरु; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह इतरांना 'हे' नियम पाळुन प्रवासास मुभा.
मुंबईमध्ये आजुबाजूच्या विविध शहरातून नागरिक कामासाठी येतात. सध्या रस्ते वाहतूक हा एकच मार्ग असल्याने मुंबई पश्चिम द्रुतगती मार्ग, दक्षिण मुंबईत जाण्यासाठी बीकेसी जंक्शनवर वाहनांच्या लांबच लांब रांगादेखील पहायला मिळाल्या आहेत.
मुंबई ट्राफिक जॅम
#MumbaiTraffic back https://t.co/y5O42KOeP5
— Mohit Joshi (@mcjoshi12) June 8, 2020
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर जाम
Accident on domestic airport flyover weh . Cops on scene. Both sides flyover shut for traffic now. #MondayBlues @MirchiJeeturaaj #mumbaitraffic pic.twitter.com/JfnpLi1nqd
— RAJESH ASHAR (@rajeshashar) June 8, 2020
पश्चिम द्रुतगती मार्गावर आज सकाळी डोमॅस्टिक एअरपोर्ट फ्लायओव्हर जवळ अपघातामुळेही दोन्ही बाजूची वाहतूक थांबवल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील करताना आता ई पासची परवानगीदेखील काढून टाकल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे मुंबई हळुहळू पुन्हा पर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरीही खबरदारी घेणे देखील अत्यावश्यक आहे.
मुंबईमध्ये काल (7 जून) च्या रात्री पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 48 हजार 549 पर्यंत पोहचला आहे. यामध्येही 25 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 21 हजार 196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुर्देवाने 1 हजार 636 जणांचा कोरोनामुळे बळीदेखील गेला आहे.