रहदारीचे नियम मोडणा-यांवर वचक बसण्यासाठी सरकारने नवनवीन कायदे राज्यात आणले आहेत. यात मुंबईत आतापर्यंत रहदारीचे नियम (Mumbai Traffic Rule) मोडलेल्या अनेकांवर प्रशासनाकडून दंड आकारण्यात आला आहे. या दंडासाठी त्यांना ई-चालान (E-Challan) भरावे लागत होते. मात्र आता हे ई चालान त्यांना पैशाच्या स्वरुपात भरावे लागणार आहे. यासाठी सरकारकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पैसे स्वरुपात ई चालान भरतेवेळी प्रशासनाकडून महत्त्वाची अट घालण्यात आली आहे.
रहदारीचे नियम मोडल्यानंतर जेव्हा तुम्हाला ई-चालान भरावे लागेल तेव्हा तुम्ही ते कॅश स्वरुपात देऊ शकतात. मात्र त्यासाठी एक अट असेल ती म्हणजे दंडाची रक्कम जर तेथे पोलिस अधिकारी असेल तरच ते देऊ शकता. कॉन्स्टेबलकडे ही रक्कम तुम्हाला देता येणार नाही.हेदेखील वाचा- महाराष्ट्र: अजिंठा-वेरुळ लेणी उद्यापासून पर्यटकांसाठी होणार खुली
संपूर्ण महाराष्ट्रातून मागील महिन्यापर्यंत 602 कोटी चालान भरणे बाकी आहे. त्यातील 46% रक्कम ही मुंबईत येणे असून ही रक्कम 280 कोटी आहे. मुंबईत ई-चलनाची सिस्टिम ही 2016-17 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे वाहतूकीचे नियम मोडल्यास वाहन चालकाला डिजिटल पद्धतीने ई-चलन दिले जात होते. त्यानंतर यामध्ये अधिक सुधारणा होत आता सध्या वाहन चालकाच्या मोबाईलवर ई-चलन येत असून ते त्यांना डेबिट,क्रेटिड कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेट्सचा वापर करुन फोनआणि कंप्युटरच्या माध्यमातून दंड भरता येतो.
मुंबई ट्रॅफिक पोलिस ही महाराष्ट्रातील पहिली पोलिस आहेत ज्यांनी ई-चालान पद्धत राबविली आहे. मुंबईतील रस्त्यांवर 5000 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. ज्यामुळे रस्त्यांवरील प्रत्येक हालचालींवर, ट्रॅफिकचे नियम मोडणारे वाहनचालक सरकारच्या नजरेत राहतात. ठाण्यात मागील वर्षी हे सेवा कॅश पद्धतीने सुरु करण्यात आली होती. मात्र मुंबई आणि पुण्यात ही सेवा कॅशलेसच होत होती. त्यात आता मुंबईतही ही सेवा पैसे स्वरुपात सुरु करण्यात आली आहे.