Mumbai: भायखळा येथील तुरुंगात कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली आहे. त्यानुसार 20 महिला, पाच मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त पुरुषांच्या वॉर्डात 10 कैद्यांना ही कोरोना झाला आहे. या दहा कैद्यांमध्ये एका वरिष्ठ नागरिकाचा समावेश आहे. सर्व कोरोना संक्रमितांना शाळेजवळ उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर वरिष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व कैद्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत.(कोविड-19 संकटातील सेवाकार्यासाठी अंगणवाडी सेविकांचा 'नमितो तुला' गीताद्वारे सांगीतिक सन्मान)
कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, गेल्याच आठवड्यात तुरुगांत कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान रुग्णांसदर्भात माहिती समोर आली. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट्स समोर आल्यानंतर तातडीने कैद्यांसह अन्य कैद्यांना सुद्धा उपचारासाठी पाठवण्यात आले. या दरम्यान जेल अधिकाऱ्यांनी म्हटले की, तुरुंगाच्या आतमध्ये वेळोवेळी कोरोनाच्या तपासणीचे अभियान राबवले जात आहे.(Covid-19 Update in Maharashtra: मागील 24 तासांत राज्यात 3,320 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; 61 जणांचा मृत्यू)
तसेच कैद्यांची कोरोनाची चाचणी नियमित रुपात केली जाते. कारण कैद्यांना कोर्टाच्या तारखा आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले जाते. अशातच बाहेरील व्यक्तींसोबत येणाऱ्या संपर्कामुळे ते संक्रमित होण्याची शक्यता अधिक वाढते. या सर्व गोष्टी लक्षात घेता वेळोवेळी कोरोनाची चाचणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.