चोरट्यांनी मौल्यवान वस्तू, महागड्या गाड्या चोरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पण कुणी गॅस सिलेंडर चोरल्याचं ऐकलंय का? पण मुंबईत अशी एक घटना समोर आली आहे. भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi) एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध 3 डोमेस्टिक गॅस सिलेंडर चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या इंधनदराचा भडका उडाल्याने वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतींमधून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, चोरी झालेल्या घरातील कुटुंब लग्नकार्यासाठी हैदराबादला गेले होते त्या संधीचा फायदा घेत गॅस सिलेंडर चोरले गेल्याचं म्हटलं आहे.
विकेंडला जेव्हा चोरी झालेल्या घरमालकाची मुलगी त्यांची घरी गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तिला घराचं दार उघडलच असल्याचं दिसलं. घरातले 3 सिलेंडर गायब होते. सोबत 23,100 रूपयांचा ऐवज पळवला होता. ही भिवंडीच्या भोईवाडा मधील घटना आहे. रविवारी यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 3 सिलेंडर्स गायब आहेत तर कपाटातील 2 मोबाईल देखील गहाळ आहेत. हे देखील नक्की वाचा: Maharashtra: ठाणे येथे पेट्रोलपंपावर चोरी करण्याप्रकरणी पाच जणांना अटक .
भोईवाडा पोलिस स्थानकातील सब इन्सपेक्टर दिनेश लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2-3 जणांनी मिळून ही घुसखोरी केली आहे. लोखंडी सळीने त्यांनी मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर महत्त्वाच्या वस्तू चोरल्या.
पोलिसांनी कलम 457,380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फूटेज पाहिलं जाईल असं सांगितलं आहे. त्या फूटेजच्या आधारे चोरांचा शोध लावला जाणार आहे.