ठाणे: व्हॉट्सअ‍ॅप वरुन ट्रिपल तलाक दिल्याने बायकोची पोलिसात धाव
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) येथे एका नवऱ्याने बायकोला व्हॉट्सअ‍ॅपवरुन ट्रिपल तलाक (Triple Talaq) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस स्थानकात पीडित महिलेने धाव घेतली आहे.

पीडित महिला ही दिव्यांग असून तिचे 18 मे 2014 रोजी कल्याण येथील एका व्यक्तीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर नवऱ्याकडून तिचा छळ केला जाऊ लागला. तसेच तिच्याकडून 10 लाख रुपये दिले नाही तर घरातून हकलावून लावीन अशी धमकी वारंवार नवऱ्याकडून देण्यात येत होती.

पीडित महिला सध्या भिवंडीत आपल्या माहेरच्या मंडळींसह राहत आहेत. दरम्यान तिला नवऱ्याकडून ट्रिपल तलाक देत असल्याचा मेसेज नवऱ्याकडून व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आला. त्यानंतर महिलेने नवऱ्यासोबत याबद्दल बोलायचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिच्यासोबत बोलण्याच धुडकावून लावले.(वैद्यकिय अभ्यासक्रमातून वादग्रस्त 'टू फिंगर टेस्ट' हटवण्याचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय)

तर पीडित महिलेने पोलिसात धाव घेत नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोहचली. परंतु अद्याप पोलिसांनी जो पर्यंत अधिकृत कारण कळत नाही तो पर्यंत तक्रार नोंदवणार नसल्याचे सांगितले आहे.