वैद्यकिय अभ्यासक्रमातून वादग्रस्त 'टू फिंगर टेस्ट' हटवण्याचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Unsplash.com)

कौमार्याची चाचणी म्हणजेच 'टू फिंगर टेस्ट' (Two Fingers Test) वैद्यकिय अभ्यासक्रमातून वगळ्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. तसेच टू फिंगर टेस्ट अवैज्ञानिक असल्याचे सांगण्यात आल्यामुळे तो वगळ्यात आला आहे.

डॉ. खांडेकर यांनी एका अहवालामध्ये कौमार्य चाचणीला कोणताही वैद्यकिय किंवा वैज्ञानिक आधार नसल्याचे म्हटले आहे. तर ही चाचणी एमबीबीएस न्यायवैद्यक शास्रातून वगळण्यात यावी अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती.(महाराष्ट्र: 'कौमार्य चाचणी' आता ठरणार दंडनीय गुन्हा, कंजरभाट सह अनेक समुदयांमधील नववधूंना द्यावी लागणारी Virginity Test ठरणार लैंगिक अत्याचार)

टू फिंगर टेस्ट ही मानवी अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. तर बऱ्याच वेळा कनिष्ठ आणि उच्च न्यायालयात न्यायमूर्तींकडून पुस्तकातील माहिती ही वैज्ञानिक असल्याचे मानून महिलांच्या कौमार्याची चाचणी करण्याचे आदेश देतात.